पैठण, (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पैठण तालुक्यातील दाभरुळ, रजापुर व आडगाव जावळे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.
या वेळी शेतकरी व शेतमजूर, महिला वर्ग, विद्यार्थिनी व महिला बचत गटाच्या कर्जफेडीच्या संदर्भात विविध प्रश्नांवर चर्चा करून शासनाकडून जास्तीत
जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विलास भैय्या शेळके, माजी आमदार संजय वाकचौरे, अनिल हजारे, बंडू जाधव, संजय गोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, राम पवार, शास्त्री जावळे युवराज चावरे, कौसर पटेल, प्रद्युम्न वाघ, गजानन नारळे या सर्व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.














